त्या' अपघातातील दुसऱ्या जखमीचाही मृत्यू



टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा
महादेव येथील गायकवाड निंबोणी मळा परिसरात ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातातील जखमी प्रतीक अनिल गोरे (वय २२, रा. कमालपूर) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. वडाळा महादेव परिसरात ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात घडला होता. 
या अपघातात ट्रॅक्टरखाली दबलेल्या व्यक्तींना बाहेर काढत रुग्णवाहिकेतून वैद्यकीय उपचारासाठी श्रीरामपूर साखर कामगार रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यातील नाऊर येथील ट्रॅक्टर चालक रोहित अहिरे हा मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर याच अपघातातील जखमी प्रतीक अनिल गोरे याच्यावर प्रवरानगर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments