टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर कंटेनर व स्विप्ट कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहीती अशी की बाभळेश्वरकडून श्रीरामपूरकडे येणारा कंटेनर क्रमांक एच.आर.६७ एफ.३००२ याची आणि श्रीरामपूरकडून बाभळेश्वरकडे जात असलेल्या स्विप्ट कारची समोरासमोर धडक झाली.सदरच्या अपघाताचा आवाज खुप मोठा झाल्याने परिसरातील दुकानदार व प्रवासी या ठिकाणी मदतीसाठी धावले.
या अपघातात कारचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.जखमींना कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर त्यांना प्रवरा ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रशांत चव्हाण,संगिता चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण,ऐश्वर्या चव्हाण, यांचा जागीच मृत्यू झाला तर रुद्र चव्हाण सारीका चव्हाण ऋत्वी चव्हाण हे जखमी असून त्यांचेवर लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
0 Comments