टाकळीभानमध्ये मुरूम माफिया यांचे टोळी युद्ध भडकले, एक गंभीर जखमी चारजणा विरोधात गुन्हे दाखल,

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी -गेल्या काही दिवसांपासुन खदखदत आसलेल्या टोळीयुध्दाचा टाकळीभान येथे आखेर भडका उडालाच. या हाणामारीत एक जण जखमी झाला आसुन याबाबत श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

          टाकळीभान येथे गेल्या काही दिवसांपासुन गौणखनिज उत्खनन जोमात सुरु आहे. या धंद्यात दोन तीन टोळ्या कार्यरत आसल्याने व्यवसायीक स्पर्धेतुन अधुन मधुन धुसफुस सुरु आसते. माञ काल या टोळीयुध्दाचा भडका सार्वजनिक ठिकाणी उडाल्याने काही काळ तणावाची परीस्थिती निर्माण झाली होती.
 या हाणामारीत तुषार पवार हा तरुण जखमी झाला आसुन त्याच्या वहानाची हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे. याबाबत तुषार बाळासाहेब पवार वय २६ वर्षे, धंदा शेती, रा. पाचेगाव ता.नेवासा यांनी श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
          या फिर्यादित म्हटले आहे कि,  वरील तारखेस व वेळी यातील आरोपीम १) लाला उर्फ विजय किशोर मैड २)मनोज यशवंत पवार ३) विठ्ठल पुंजाहारी जाधव ४), संकेत सर्जेराव गायकवाड सर्व रा टाकळीभान ता श्रीरामपुर यांनी फिर्यादी हे टाकळीभान येथील अक्षय बनकर येथील भेळीचे दुकानावर भेळ घेण्यास गेले असता तेथे वरील आरोपी त्यांना म्हणाले कि तु बाहेर गावातुन येवुन येथे मुरुन व्यवसाय करतो काय  ? तुझ्याकडे पहातो असे म्हणुन आरोपी १ याने हातत गावठी कट्यासारखे हत्याराने मारले. आरोपी न २ याने तलवारने मारले आरोपी न ३ याने हातातील लोखंडी रॉडने मारले आरोपी न ४ याने त्याचे हातातील धारदार कत्तीने मारहाण केली व आरोपी ईतर २ ते ३ अनोळखी इसमांनी शिवीगाळ करुन त्याचे हातातील लाकडी दांडक्याने मारले. वरील आरोपी यांनी स्विप्ट गाडीचे काचा फोडुन तिचे नुकसान केले.
      फिर्यादी हे लोणी प्रवरा हाँस्पिटल येथे औषधोपचार घेत असताना त्याचे दिलेला जबाबावरुन नमुद गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास वरीष्ठाच्या आदेशाने पोसई डौले सो हे करीत आहेत. फिर्यादिच्या फिर्यादीनुसार
रजि.नं व कलम गुरनं 235/2025 भा न्या सं का क 109,189(2),189(4),191(3),190,351(2) (3),35 4/25 प्रमाणे वरील आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments