दिलीप लोखंडे
टाकळीभान : येथील नानासाहेब विश्वनाथ बनकर यांच्या गुजरवाडी गट नंबर १८/१ मध्ये कॅनॉल लगत शेतामध्ये बिबट्याने कुत्रा व डुक्कर शिकार करून कुत्र्याला झाडावर नेऊन शिकार केली आहे. त्या कुत्र्याचे अवशेष झाडावर लटकलेले असून ठार केलेल्या डुकराचे अवशेष झाडाखाली पडलेले आढळून आले .
त्याचप्रमाणे कॅनॉल रोडलाच एका शेतकऱ्याची शेळी व कालवडीवरही बिबट्याने हल्ला केला असून त्यांना हल्ल्यात ठार केले आहे. गेल्या आठ ,दहा दिवसापासून या भागामध्येच बिबट्याचा सातत्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला होत असल्यामुळे टाकळीभान टेल टॅंक व कॅनल रोड परिसरामध्ये बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर बिबट्याने केलेल्या हल्ल्याची पाहणी .
वन विभागाचेअधिकारी आयुष्यमान बढे यांनी करून पंचनामा केला. याप्रसंगी नागरिकांना मार्गदर्शन करताना बडे म्हणाले की नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतामध्ये फिरू नये, बिबट्या सारख्या हिंस्र प्राण्यापासून सावध राहावे. व काळजी घेण्याचे आवाहन केले. दहा-बारा पिंजरे जे काही श्रीरामपूर तालुक्यामध्ये उपलब्ध होते त्यामध्ये बिबटे जेर बंद असून मोकळे पिंजरे उपलब्ध नसल्याने बिबट्याचे हल्ले रोखणे मुश्किल होत आहे. तरी शासनाने शिर्डी संस्थान द्वारे पिंजऱ्यांची उपलब्धता करून देऊन नागरिकांना भेडसावणारा हा महत्त्वाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
0 Comments