सोयगाव तालुक्यातील गोकुळसिंग राजपूत शहीद भगतसिंग योद्धा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ----



दिलीप शिंदे
सोयगाव दि.१९-- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने लातूर येथे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील उपसंपादक तथा मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत आणि अजिंठा येथील राष्ट्रीय संघटक अरुण चव्हाण देशमुख यांना ‘शहीद भगतसिंग योद्धा राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. सामाजिक, समाजहिताचे तसेच देशहिताचे कार्य करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या वर्षभरातील कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने संघटनेचे सालाबादप्रमाणे राष्ट्रीय अधिवेशन लातूर येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनास देशातील तसेच महाराष्ट्रातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर आणि अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांचे नातू अमित आझाद तिवारी यांच्या हस्ते गोकुळसिंग राजपूत व अरुण चव्हाण देशमुख यांना पुष्पगुच्छ, पुष्पहार आणि सन्मानपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष युवक विभाग पृथ्वीराजसिंह पाटील खंडापूरकर, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी राणीताई स्वामी, लताताई त्रिवेदी, उषाताई मिश्रा, नेहाजी तिवारी आझाद यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर राष्ट्रगीताने राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता करण्यात आली.दरम्यान सोयगाव येथील गोकुळसिंग राजपूत आणि अरुण चव्हाण देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जगताप पाटील, गजानन काळे, ईश्वर हिवाळे, शंकर भामरे, तालुकाध्यक्ष सुनील चोरमारे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप देशमुख, संदीप राजपूत, कोषाध्यक्ष मुरलीधर दाभाडे, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी सौ. अंजना राजपूत, जिल्हा शहराध्यक्ष परमानंदजी शुक्ला, मराठवाडा विभागीय अध्यक्ष महिला आघाडी लताताई त्रिवेदी, सौ. उषाताई मिश्रा, गजानन काळे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण ढाकरे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे,सचिव संदीप इंगळे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments