टाकळीभान प्रतिनिधी -गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी टाकळीभान येथे पोलिसांचा रूट मार्च काढण्यात व आला.
उत्सव काळात पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. स पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ,विभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, यांचे आदेशावरून परी पोलीस उपाधीक्षक श्रीमती कल्पना पवार, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पी एसआय सतीश डवले
टाकळीभान येथे रूट मार्च करण्यात आला,
यावेळी गणेशोत्सव शांततेत साजरा करा गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. डीजेवर बंदी असल्याने पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीन कारवाई केली जाईल, असा इशारा परी पोलीस उपाधीक्षक श्रीमती कल्पना पवार यांन दिला.
या रूट मार्च मध्ये हेडकॉन्स्टेबल रामेश्वर ढाकणे, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथील 25 ते 30 पोलीस अंमलदार, 25 RCP जवानव10 होमगार्ड सहभागी झाले होते,
0 Comments