राजकुमार गडकरी
अशाच प्रकारे आंध्र प्रदेशातील एका साईभक्ताने साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन साई बाबांना सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी, आंध्रप्रदेश मधील गुंटूर येथील एका साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला असून या मुकुटाची किंमत अंदाजे ६८ लाख रुपये असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी दिली. अनेक साई भक्त असे आहेत की ते देणगी दिली तरी नाव गुप्त ठेवतात. या साईभक्तांनीही सुमारे 68 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे .मात्र आपले नाव गुप्त ठेवले आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments