टाकळीभान प्रतिनिधी- शहरातील वार्ड नं २ मधील रहिवास बंटी जहागीरदारची काल जर्मन रुग्णालयासमोर गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दोघांना पोलीसांनी आज पकडले असून एसपी श्री.सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशाप्रमाणे आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक 31/12/2025 रोजी दुपारी 14.50 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर शहर येथे कब्रस्तान जवळ बंटी उर्फ अस्लम जहागीरदारवर गोळीबार झाल्याने दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. व सोबत असणारा अमिन गुलाब शेख हा जखमी झाला आहे.
यानुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1/26 कलम 103,109,3(5) BNS तसेच आर्म ऍक्ट कलम 3(25) खाली ०२ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान मृतदेहावर घाटी रुग्णालय,छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
पोलिसांचे 3 पथके यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेली होती. रात्री उशिरा यातील दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत. त्यांची नावे 1) कुष्णा अरुण शिनगारे,वय 23 वर्ष,रा-सिध्दार्थनगर,वार्ड नं 1,श्रीरामपूर 2) रविंद्र गौतम निकाळजे,वय 20 वर्ष,रा-भिमनगर,वार्ड नं 6,श्रीरामपूर असे असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.
गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींकडे सखोल विचारपूस करण्यात येत आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आरोपींनी कोठून आणले? गुन्ह्याचा प्लॅन कोणी व कसा केला? गुन्ह्यामध्ये अन्य कोण-कोण आरोपी सामील आहेत किंवा कसे? व गुन्हा करण्यामागे नेमके कारण काय ? या बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहे अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर देखील पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कोणीही घटनेसंबंधाने आक्षेपार्ह वा आपत्तीजनक पोस्ट शेअर केल्यास वा घटनेबाबत कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध केल्यास किंवा अफवा पसरविल्यास त्यांच्यावर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.
जिल्ह्याचे एसपी सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी भवर,पोनि देशमुख हे पुढील तपास करीत आहे. बंटी जहागीरदारवर पुणे बॉम्बस्फोटसह १७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींकडे सखोल विचारपूस करण्यात येत आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आरोपींनी कोठून आणली? गुन्ह्याचा प्लॅन कसा केला? गुन्ह्यामध्ये अन्य कोणी आरोपी सामील आहेत किंवा कसे? व गुन्हा करण्यामागे नेमके कारण काय या बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर देखील पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कोणीही घटनेसंबंधाने आक्षेपार्य वा आपत्ती जनक पोस्ट शेअर केल्यास वा घटनेबाबत कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध केल्यास किंवा अफवा पसरविल्यास त्यांचेवर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. एसपी सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शना खाली डीवायएसपी भवर,पोनि देशमुख हे पुढील तपास करीत आहे .
0 Comments