सावळीविहीर खुर्द येथे पतंग खेळताना अचानक विहिरीत पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू!सावळीविहीर व परिसरात हळहळ!

शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथे पतंग खेळताना जवळच असणारी पाण्याची खोल विहीर लक्षात न आल्याने एक आठ वर्षीय मुलगा या विहिरीत पडून मृत्युमुखी पडला. ही घटना बुधवारी 25 डिसेंबरला दुपारच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सावळीविहीर व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

या घटने संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील गावामध्ये यश हिरामण सोनवणे (वय वर्ष आठ) हा पहिलीत शिकणारा मुलगा नाताळची सुट्टी असल्यामुळे घरी होता. तो पतंग खेळत असताना जवळच असणाऱ्या व कठडा नसणाऱ्या आणि लक्षात न आलेल्या एका विहिरीमध्ये पडला. त्याच्या समवेत असणारी इतर मुले ओरडल्यामुळे आसपासचे लोक जमा झाले . माजी सरपंच महेश जमधडे, अशोकराव जमधडे , सुधीर वर्पे,यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सागर जाधव यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे एपीआय कायंदे, पो. ना. माळी ,पो. कॉ. झरेकर, दळवी, माळी, सागर जाधव,व साई संस्थान व शिर्डी नगरपालिकेचे अग्निशामक बंब,हे पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी या मुलाला सुमारे 40 ते 45 फूट पाणी असणाऱ्या या विहिरीत दोर गळ टाकून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन अडीच तासानंतर मोठ्या प्रयत्नाने हा मुलगा  या दोर गळाला लागला. मात्र तो मयत  झाला होता.त्यानंतर त्यास विहिरीतून बाहेर काढण्यात आले. पतंग खेळताना या चिमुकल्याचा जीव गेला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राहता येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी शव पाठवण्यात आले . या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments