कॉलेज तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन



टाकळीभान(प्रतिनिधी)—नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील कॉलेज तरुणी कु, साक्षी कैलास शेरकर (१७) हिचे नूकतेच हृदय विकाराने निधन झाले. टाकळीभान येथील न्यु इंग्लिश स्कुल व कै.आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात साक्षी ही इयत्ता १२ वी काॅमर्स शाखेत शिक्षण घेत होती. 

तिच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या पश्चात वडील, आजोबा, चुलते, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. अशोक कारखान्याचे कर्मचारी कैलास शेरकर यांची ती मुलगी होत.

Post a Comment

0 Comments