ऋषीकेश छल्लारे यांचे अपघाती निधन...
टाकळीभान प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील सामाजीक कार्यकर्ते व असंघटीत कामगार संघटनेचे नेते गणेश उर्फ किशोर भारत छल्लारे यांचे चिरंजीव ऋषीकेश किशोर छल्लारे ( वय -१८) मोटारसायकल व डंपर अपघातात उपचारा दरम्यान निधन झाले.
भोकर सोसायटीचे माजी चेअरमन, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे कट्टर समर्थक असलेले गणेश उर्फ किशोर छल्लारे यांचा एकुलता एक चिरंजीव ऋषीकेश किशोर छल्लारे हा शनिवार दि.७ जून च्या सायंकाळी खोकर फाटा येथील लक्ष्मीमाता मिल्क जवळ सुरु असलेल्या कामावर देखरेख करत असताना अचानक मोटार सायकल - डंपर अपघातात गंभीर जखमी झाले.
अपघात घडल्याचे समजताच स्थानिक युवकांनी त्यास तातडीने प्रथम श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तेथून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील मॅक केअर हॉस्पीटल मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
परंतू गंभीर जखमी ऋषीकेश याने सुमारे तीन तास मृत्यूशी झुंज दिली, दुर्देवाने त्यावर काळाने घाला घातला आणि रात्री ८.३० च्या सुमारास त्याचे निधन झाले.
त्याचे पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, एक बहीण, चुलते, चुलती, चुलत भाऊ, बहीण असा परिवार आहे.
चि. ऋषीकेश छल्लारे याचेवर काल दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments