टाकळीभान प्रतिनिधी- सविस्तर बातमीचीअशी की, दिनांक 07/12/2025 रोजी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थागुशा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत, केडगाव बायपास रोडलगत असलेल्या अनुराज टायर या गोडऊन मध्ये अवैधरित्या टॅकरमधुन व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती .
मिळाल्याने, पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी हरिष भोये, अनंत सालुगडे, व पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, दिपक घाटकर, बिरप्पा करमल, राहुल द्वारके, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सतिष भवर, योगेश कर्डिले, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे, भगवान धुळे, अरुण मोरे अशांचे पथक नेमुन बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथकाने तात्काळ केडगाव बायपास रोडलगत असलेल्या पत्र्याचे गोडाऊनमध्ये गॅस रिफिलींग होत असल्याची खात्री झाल्याने, सदर ठिकाणी छापा टाकुन गॅस रिफीलिंग करत असलेले इसमांना ताब्यात घेवुन, त्यांना पोलीसांची व पंचांची ओळख सांगुन, त्यांचे नांव गाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नांव 1) कृष्णा मधुकर दहिफळे वय- 30 वर्षे रा. कोळवाडी, पोस्ट किनगाव, ता. अहमदपुर, जि. लातुर, 2) अदित्य सुनिल पवार वय - 21 वर्षे रा. बीबी ता.लोणार जि. बुलढाणा, हल्ली रा. निल हॉटेल केडगांव अहिल्यानगर, 3) विश्वास त्रिंबक शिंदे वय -51 वर्षे रा. केडगांव, अहिल्यानगर, 4) जनातुल शेख वय- 19 वर्षे रा. चापरा, बांगलजी, ता.नदीया, जि.नदीया, वेस्ट बंगाल, हल्ली रा.निल हॉटेल, केडगांव अहिल्यानगर, असे असल्याचे सांगितले. त्यानंतर गोडाऊनचे मालकाबाबत विश्वास त्रिंबक शिंदे, यांचेकडे विचारपुस करता सदर गोडऊनचे मालक 5) राजु साबळे रा. केडगांव अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांना ते रिफिलींग करित असलेल्या कामाबाबत परवाना आहे काय? याबाबत विचारपुस करता त्यांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाना नसल्याचे सांगुन, स्वतःचे आर्थिक फायद्या करीता एच.पी गॅस टॅकरमधुन जुगाड करुन व्यवसायीक गॅस टाक्यमामध्ये भरत असल्याचे सांगितले.
पथकाने घटना ठिकाणचा पंचासमक्ष पंचनामा करुन 1) 8,36,339/-रुपये कि.चे एच.पी. कंपनीचा गॅस 17 टन गॅस, 30,00,000/- रुपये कि.चे टॅकर, 2) 60,000/- रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 20 रिकाम्या गॅस टाक्या, 3) 22,500/- रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 05 भरलेल्या गॅस टाक्या, 4) 2,00,000/- रुपये किमतीचा एक छोटा हत्ती टेम्पो ,5) 500/- रुपये कि.ची एक अडजेस्टेबल लोखंडी पाना, 6) 5,000/- रुपये कि.चा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, 7) 2000/-रु कि.चा गॅस भरण्यासाठी वापले जाणारे पाच पाईप असलेले नौजल असा एकुण 41,26,339 /- रुपये किमतीची मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, बेकायदेशिररित्या स्वतःचे आर्थिक फायद्या करीता एच.पी. कंपनीच्या गॅट टॅकरमधुन भारत गॅस कंपनीच्या व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफिलींग करतांना ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल, अशा धोकादायक पध्दतीने रिफिलींग करतांना मिळुन आलेले आहे.
ताब्यातील आरोपी विरुध्द कोतवाली पो.स्टे. गु.र.नं.1110 /2024 भारतीय न्याय संहिता कलम 287, 288, सह जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 चेकलम 3, 7, सह एल पी जी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश 2000 चेकलम 3(2)(b) सह गॅस सिलेंडर अधिनियम 2016 चेकलम 43, 45, 46, सह स्फोटके अधिनियम 1884 चेकलम 9(b) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
0 Comments