सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
श्री. क्षेत्र पिंपळदरी येथील येडू मातेचा गड परिसर चार दिवस यात्रेसाठी राखीव करा अशी मागणी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
श्री. अहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की संपूर्ण राज्यातील आदिवासी भिल्ल समाजाचे आराध्य दैवत असलेल्या अकोला तालुक्यातील पिंपळदरी येथील येडू मातीची जत्रा चैत्र पौर्णिमेला मोठ्या भक्ती भावाने साजरी केली जाते संपूर्ण राज्यातून लाखो आदिवासी आपल्या मुलाबाळांसह यात्रेत सहभागी होतात. देवीची आदिवासी रूढीपरंपरे नुसार पूजा केली जाते. सदर देवस्थान वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येते असे असतांनाही स्थानिक लोकांनी अतिक्रमणे करून खूप जागा व्यापली आहे त्यामुळे यात्रेसाठी येणाऱ्या आदिवासींना थांबण्यासाठी जागा अपुरी पडते. नवस पुर्ण करण्यासाठी दोन दिवस अगोदरच आदिवासी या ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत मुक्कामास येतात परंतु स्थानिक शेतकरी त्यांना थांबण्यासाठी विरोध करून वाद निर्माण करतात त्यामुळे अनेक वेळा गावकरी आणि यात्रे करू यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो. सदर देवस्थान वन विभागाच्या जमिनीवर आहे परंतु पिंपळदरी गावातील नागरिक यात्रेकरूंना विरोध करून येडू आई गड परिसरात थांबू देत नाहीत. त्यामुळे परिणामी नवस पूर्ण करण्यासाठी आलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांना थांबण्यासाठी जागाच मिळत नाही.त्यामुळे मा. जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या येडुआई गड परिसर यात्रेच्या तीन दिवस अगोदर व यात्रेच्या मुख्य दिवशी असे चार दिवस सदर परिसर यात्रेसाठी आरक्षित करावा त्यामुळे गावकरी व आदिवासींमध्ये संघर्ष होणार नाही व संपूर्ण राज्यातून आलेल्या भिल्ल समाजाला देवीची पूजा अर्चा करून नवस पूर्ण करता येईल. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आदिवासींच्या भावना भडकल्यास त्यास शासनच जबाबदार राहील असा इशारा देखील ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे. निवेदनावर ज्ञानेश्वर अहिरे, राधाकृष्ण बर्डे, अनिलराव बर्डे यांच्या सह्या आहेत.
0 Comments