दिलीप शिंदे
सोयगाव दि.०८- सोयगाव तालुक्यातील जंगलातांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.०८ सोमवारी दशसुत्री कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश चव्हाण, डॉ. शितल डोके, आकाश चवरे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
. यावेळी आदर्श शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक रामदास फुसे यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश चव्हाण, डॉ. शितल डोके, औषध निर्माता आकाश चावरे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.रमेश चव्हाण यांनी आरोग्य विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.तर डॉ.शीतल डोके यांनी मुलींना त्यांच्या समस्ये विषयी योग्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ.चव्हाण यांनी तर मुलींची तपासणी डॉ. शितल डोके यांनी केली.औषध निर्माता आकाश चवरे यांनी औषधी वाटप केले. आरोग्य तपासणी शिबिरात शाळेतील २०७ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामदास फुसे यांनी तर आभार राहुल सोनार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक गजानन कोळी, रघुनाथ राठोड,विनोद जाधव, पुष्पा सोनार,अश्विनी पवार,अनिल दामधर,सतीश इंगळे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments