खानापुर शिवारात दरोडा; पावणे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला[श्रीरामपुर तालुक्यातील खानापुर येथील घटना]

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठ परीसरातील खानापुर शिवारात भोपळे वस्तीवर बंगल्याच्या दुसर्या मजल्यावरील बेडरुमच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडुन हत्यारांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील,घरातील दागिने व कपाटातील रोख रक्कमेसह एकुण पावणे दहा लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून पोबारा केला.शनिवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

            बीड येथील रहिवासी असलेले मंत्रालयातील नगर विकास खात्याचे संचालक जितेंद्र भोपळे व बीडचे नगरसेवक धर्मेंद्र भोपळे या बंधुनी काही वर्षांपुर्वी खानापूर येथे शेती घेतलेली आहे.याठीकाणी बांधलेल्या बंगल्यात सुट्टीत सर्व भोपळे बंधू राहावयास असतात.ईतर वेळी त्यांच्या मातोश्री एकट्या असतात.शनिवारी रात्री भोपळे यांच्या मातोश्री रात्री एकट्या घरात असल्याचा फायदा घेत अज्ञात सहा दरोडेखोरांनी घरात घुसुन मोठी चोरी केल्याचा प्रकार घडला. 
    श्रीरामपुर तालुका पोलिसात श्रीमती विजयादेवी लक्ष्मण भोपळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शनिवार दि १ मार्चच्या रात्री १ ते ३ वाजेदरम्यान अनोळखी सहा ईसमांनी बंगल्याच्या वरील मजल्यावरील बेडरुमचा दरवाजाचा आतील कडीकोंडा तोडुन घरामधे प्रवेश करत फीर्यादी श्रीमती विजयादेवी भोपळे यांना कोयत्याचा धाक दाखवत व तोंड दाबुन फीर्यादीच्या अंगावरील व घरातील सहा तोळे वजनाच्या २ नग सोन्याच्या पाटल्या,प्रत्येकी अडीच तोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या,१० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या,साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण,१२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन‌ जोड व कपाटातील साठ हजार रुपये रोख रक्कम अशी एकुण ९ लाख ८० हजार रुपयांचे दागिणे व रोख रक्कम कोयत्याचा धाक दाखवुन व जीवे मारण्याची धमकी देऊन चोरुन नेले.
      घटनेची माहीती मिळताच श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक कलबुर्मे,पोलीस अधिक्षक बसवराज शिवपुजे,पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी,पो हे कॉं.आयुष शेख यांनी रविवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करत आहे.
(सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान)

Post a Comment

0 Comments