राहाता येथे संत तुकाराम महाराज मंदिरात तुकाराम बीजे निमित्त संकिर्तन महोत्सव व समाजरत्न पुरस्कार सोहळ्याचे रविवारी आयोजन-एड. रामनाथ सदाफळ

शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता येथील 15 चारी वरील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर येथे कै. भाऊसाहेब सजन पा. सदाफळ यांच्या स्मरणार्थ सालाबाद प्रमाणे यावर्षीही जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज संकिर्तन महोत्सव व समाज रत्न पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 16 मार्च २०२५ रोजी सकाळी दहा ते बारा या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
(पुरस्कारते.. दत्तात्रेय मुंडोजी चौधरी पाटील)
  दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार 16 मार्च 2025 रोजी राहता येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर 15 चारी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज संकिर्तन महोत्सव व समाज रत्न पुरस्कार आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती बँक ऑफ बडोदा चे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी सन्माननीय दत्तात्रेय मुंडोजी पाटील चौधरी हे असणार असून शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या शुभहस्ते व राहत्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक एडवोकेट व पत्रकार  रामनाथ भाऊसाहेब सदाफळ हे असून या ट्रस्टचे सर्व उपाध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त, मित्रपरिवार तसेच कैलास भाऊसाहेब पाटील सदाफळ व मुख्याधिकारी बाळासाहेब रामनाथ गुळवे हे मार्गदर्शक राहणार आहेत. यावेळी भागवत कथाकार ह भ प विकास महाराज गायकवाड रुई यांचे कीर्तन होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहान एडवोकेट रामनाथ भाऊसाहेब सदाफळ राहता यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments