सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
टाकळीभान प्रतिनिधी : अशोकनगर फाटा परिसरातील रेल्वे बोगदा ४८ चौकीजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. भटके कुत्रे काही तरी तोडत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले.
नागरिकांनी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना माहिती दिली. पोलिस नाईक किरण टेकाळे घटनास्थळी गेले. मृतदेहाजवळ चप्पल आणि अंगावरील वस्त्र जळालेल्या अवस्थेत दिसून आले. मृतदेहावर जळालेली अंडरवेअर वगळता एकही कपडा नाही. सदर व्यक्तीच्या गळ्याभोवती मोठी जखम आढळून आली आहे. त्यामुळे हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तो जाळला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. सदर मृतदेहाचा पंचनामा करून तो साखर कामगार रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, श्रीरामपूर येथील अमोल आबासाहेब पटारे (वय ३४ रा. खिलारी वस्ती) हे बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. स्थानिक व नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह, चप्पल, वस्त्र व मोबाईलची पाहणी करून सदरचा मृतदेह अमोल आबासाहेब पटारे याचा असल्याची खात्री पटली.
0 Comments