क‌ट्ट्यासह दोघे पकडले; अप्पर अधीक्षकांच्या पथकाची कारवाई, धरपकड सञ सुरु...

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)



   टाकळीभान प्रतिनिधी - याबाबत अधिक माहिती अशी की, काल दिनांक 29/11/2025 रोजी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय,श्रीरामपुर येथे अपर पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहीती मिळाली की, दोन ईसम नामे साहिल शकिल पिंजारी रा. मोरगेवस्ती वार्ड नं.07 श्रीरामपुर हा त्याचा साथीदार हे नॉर्दन ब्रँच चौक ते डावखर चौक जाणा-या रोडवर टावर चौक परीसर वार्ड नं. 07 ,मोरगेवस्ती श्रीरामपुर येथे गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आला आहे.

अशी खात्रीशीर माहीती मिळाली असता अपर पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ वाघचौरे श्रीरामपुर यांनी लागलीच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकातील पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे यांना सुचना देवुन पोलीस निरीक्षक,श्रीरामपुर शहर यांची मदत घेवुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
        सदर पथकाला त्या ठिकाणी दोन इसम हे संशयीतरीत्या फिरताना मिळुन आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवुन ओळख विचारली असता त्यांनी साहिल शकिल पिंजारी, वय 23 वर्षे,रा-मोरगेवस्ती,वार्ड नं 07,ता.श्रीरामपुर व एक विधीसंघर्षीत बालक असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्टाल व एक जिवंत काडतुस मिळुन आले. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने आणले आहे. सदर पिस्टल जप्त करण्यात आले असून श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे गुं.र.नं. 1054/2025 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        सदर गुन्ह्यातील आरोपी याने सदरचे अग्निशस्त्र हे कोणाकडुन आणले होते ? तसेच कोणास विक्री करणार होते ? अगर कोणता उद्देश होता? याबाबत तपास करत आहे.
      सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री.जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. नितीन देशमुख,सपोनि.गणेश जाधव व अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पोसई चारुदत्त खोंडे, पो. हे. कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना.संदीप दरंदले,पो.कॉ राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, मोबाईल सेलचे पो.हे.कॉ सचिन धनाड, पो.ना.रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पो.कॉ रविद्र अभंग यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments