“श्रीरामपुरात पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र गौरव रत्न’ सुवर्ण सोहळा; ७ डिसेंबरला उजळणार राज्यातील मान्यवरांचा भव्य सन्मान!”

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

लोणी / प्रतिनिधी - ज्ञानेश्वर साबळे, श्रीरामपुर शहराचे सांस्कृतिक आणि सामाजिक वैभव नव्या उंचीवर नेणारा एक भव्य, दिव्य आणि राज्यस्तरावर पहिलाच असा भव्य सोहळा म्हणून ओळखला जाणारा ‘महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार सोहळा’ येत्या ७ डिसेंबर रोजी गोविंदराव आदिक सभागृह, श्रीरामपूर येथे दिमाखात पार पडणार असून, या भव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. विद्याराज फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सुवर्ण सोहळ्याबाबत प्रमुख आयोजक सुनिल ईश्वर पाटील यांनी सविस्तर माहिती देत या ऐतिहासिक क्षणाचे श्रीरामपुरकरांना विशेष आमंत्रण दिले आहे.
हा पुरस्कार सोहळा केवळ कार्यक्रम नसून, महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांत आपण केलेल्या उत्तुंग कार्याचा गौरव करण्याचा एक भावपूर्ण प्रयत्न आहे. राज्यभरात साहित्य, कला, अभिनय, समाजकार्य, संगीत, पत्रकारिता, शिक्षण, वैद्यकीय सेवा, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना “महाराष्ट्र गौरव रत्न” या राज्यातील पहिल्यावहिल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार म्हणजे मान्यवरांच्या सामाजिक कार्याला मिळणारी पावती आणि त्यांच्या कर्तृत्वाची अधिकृत दखल असल्याचे प्रमुख आयोजक सुनील पाटील यांनी सांगितले.
या भव्य सोहळ्याला १००० ते १५०० प्रेक्षकांची उपस्थिती राहणार असून, श्रीरामपूर शहरात अशा उंचीचा आणि भव्यतेचा कार्यक्रम प्रथमच होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाची सजावट, प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था, सांस्कृतिक सादरीकरणे आणि मान्यवरांच्या सत्कारासाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, सध्या सभागृहात देखील रंगीत तालीम सुरू आहे.
प्रमुख आयोजक सुनील पाटील म्हणाले, “हा ‘महाराष्ट्र गौरव रत्न’ पुरस्कार हा भारतातील पहिलाच असा प्रतिष्ठित आणि सन्मानाचा सोहळा आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या अनेक पुरस्कार सोहळ्यांचे रेकॉर्ड मोडेल अशी गुणवत्ता आणि भव्यता या सोहळ्यात आहे. हा सोहळा म्हणजे आमच्या महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा तेजस्वी आरसा ठरणार आहे.”
सोहळ्यात सांस्कृतिक विभागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मराठी संस्कृतीची ओळख असणारी लावणी, गायन, वादन अशा अनेक आकर्षक कार्यक्रमांची रंगत उपस्थितांना अनुभवायला मिळणार आहे. विशेष आकर्षण म्हणून सुवर्ण पदक विजेत्या लावणी सम्राज्ञी यांची मराठमोळी, बहारदार आणि मनमोहक लावणी येथील सभागृहात रंगणार आहे. तसेच प्रसिद्ध सुवर्ण पदक विजेते संगीतकार आणि गायक यांचा खास संगीत-गायन कार्यक्रमही सोहळ्याची शोभा वाढवणार आहे.
पाटील पुढे म्हणाले,“उपस्थित राहिलात तर या कार्यक्रमाचा अविस्मरणीय आनंद नक्कीच मिळेल; हा कार्यक्रम कसा असावा आणि कसा असू शकतो, याची नवी व्याख्या हा सोहळा करणार आहे.हा सुवर्ण क्षण आपण प्रत्यक्ष अनुभवा; आपल्या आयुष्यातील हा एक दिवस स्वतःसाठी राखीव ठेवा.”
या सोहळ्यातील प्रत्येक सत्कार हा मान्यवरांच्या कष्टांचे मोल आहे. त्यांचे समाजप्रेम, त्यांची चिकाटी आणि त्यांनी निर्माण केलेला सकारात्मक प्रभाव यांचा गौरव या मंचावरून केला जाणार आहे. श्रीरामपूर शहराला व अहिल्यानगर जिल्ह्याला यामुळे सामाजिक -सांस्कृतिक प्रगतीची नवी ओळख मिळणार असल्याचा विश्वास स्वयंसेवक आणि समिती सदस्यांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, स्वागत व्यवस्थापन, मान्यवरांचे आदरातिथ्य, प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र समित्या कार्यरत असून, प्रत्येक समितीची जबाबदारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे.
आयोजक सुनील पाटील म्हणाले, “हा सोहळा श्रीरामपुराच्या वैभवाला तसेच अहिल्यानगर जिल्ह्याला नक्कीच वेगळे स्थान देईल. महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तीमत्वांच्या उपस्थितीने श्रीरामपूरची प्रतिष्ठा वाढणार आहे. त्यामुळे हा सुवर्ण क्षण चुकवू नका.”
कार्यक्रमाला येणारे सर्व मान्यवर आणि नागरिक हे इतिहासाचे साक्षीदार ठरणार आहेत. श्रीरामपूर शहरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर सांस्कृतिक आणि सन्मानाचा मेळा भरत आहे. राज्याच्या कर्तृत्वाचा गौरव, मराठी संस्कृतीचा जलवा आणि मान्यवरांच्या तेजाचा संगम असलेला हा सोहळा, निश्‍चितच श्रीरामपूरच्या व अहिल्यानगर च्या इतिहासात सुवर्णक्षण म्हणून नोंदवला जाणार आहे.
“श्रीरामपुरात पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र गौरव रत्न’ सुवर्ण सोहळा; ७ डिसेंबरला उजळणार राज्यातील मान्यवरांचा भव्य सन्मान!” 

Post a Comment

0 Comments