सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
टाकळीभान प्रतिनिधी-खोकर येथील खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयात आनंददायी शनिवार अंतर्गत बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच व्यवहारीक ज्ञान मिळावे व खर्या कमाईचे महत्व कळावे हा या उपक्रमामागील मागील उद्देश असल्याचे मुख्याध्यापिका मंदाकीनी खाजेकर यांनी सांगितले.
सरपंच आशाताई चक्रणारायण यांच्या हस्ते व अशोक कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पोपटराव जाधव,बाबासाहेब काळे,बाळासाहेब चव्हाण,बाबासाहेब पटारे आदींच्या उपस्थितीत बाल आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी ताज्या पालेभाज्या,फळभाज्या,गावराण फळे यांसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते.स्वतःच्या शेतातील भाजीपाला तसेच स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ ग्राहकांना विकताना चिमुकल्या विक्रेत्यांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडुन वाहत होता.यावेळी ग्राहकांसोबत आपल्या मालाचा भाव करताना घासाघीस करणार्या ग्राहकांना चतुरपणे हाताळणारे विद्यार्थी लक्षवेधी ठरत होते.उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री असल्याने ग्राहकांनीही या आनंद बाजाराला प्रतिसाद दिला.महीला ग्राहकांनी मोठ्या संख्येने या बाजाराला उपस्थिती लावत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.बाल आनंद बाजारात दोन तासात एकुण आठ हजार रुपयांची उलाढाल झाली.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका मंदाकीनी खाजेकर,जेष्ठ शिक्षक किशोर कवडे,संगिता राऊत,रुक्मिणी गायकवाड,सुरेखा येवले,निलेश पारवे,अनुपमा खांडगे,दिपक आदिक,संतोष कवडे,प्रियंका खराडे,अनिता डोळस अविनाश आसने आदिंचे मार्गदर्शन लाभले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments