टाकळीभान प्रतिनिधी - ग्रामीण भागातीलएकलमहिलांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असताना आता महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत अशा शहरी भागातील एकल महिलांचेही सर्वेक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर जिल्हा एकल महिमला सक्षमीकरण समितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यात प्रथमच शहरी भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण अहिल्यानगर जिल्ह्यात होणार आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, प्रकाश इथापे, विनायक देशमुख, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहोळ, तसेच विविध विभागांचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, महिला व बालविकास विभाग व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. २०२३ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ लाख ७३६ एकल महिलांची माहिती संकलित झाली होती. मात्र शहरी भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण आतापर्यंत झाले नव्हते. आता महानगरपालिका हद्दीत सुमारे दोन हजार एकल महिलांची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या धर्तीवर जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली शहरी भागातही हे सर्वेक्षण राबवावे, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. तसेच राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हानिहाय 'उमेद' मॉल सुरू करण्याबाबत माहिती देण्यात आली असून, अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी येथे हा मॉल प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. तालुका स्तरावरही उमेद मॉल सुरू करावेत व रोजगार कार्यशाळांचे आयोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुका मिशन वात्सल्य समितीच्या बैठका नियमित होत नसल्याबाबत लक्ष वेधण्यात आले. यावर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत विविध विभागांमार्फत एकल महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मिशन वात्सल्यमार्फत शासन निर्णयात नमूद असलेल्या २५ योजनांसह विविध शासकीय सेवांचे लाभएकल महिलांना मिळवून देण्याच्या सूचना केल्या,
0 Comments