श्री क्षेत्र पिंपळदरी ता. अकोले येथील येडू मातेच्या गडाची एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी कार्यकर्त्यां समवेत आज पहाणी केली.
येडू आई गड परिसर यात्रेवेळी चार दिवस आरक्षित करावा अशी मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली असून प्रशासनाकडून सदर यात्रा परिसर राखीव करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्या अनुषंगाने नेमका किती परिसर यात्रेसाठी राखीव ठेवावा याची पडताळणी करण्यासाठी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी कार्यकर्त्यां समवेत गड परिसराची पाहणी केली. व जवळपास तीस एकर परिसरामध्ये हा यात्रा उत्सव भरावाला जातो असे निदर्शनास आले. संपूर्ण राज्यातून लाखो भिल्ल समाज या यात्रेत सहभागी होऊन आपली नवसपुर्ती करतो तसेच दोन-तीन दिवस अगोदर येऊन येडुआई गड परिसरात मुलाबाळांसह वास्तव्य करतो. परंतु जागा उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबे नवस्फूर्ति न करताच माघारी जातात. त्यामुळे इथून पुढील काळामध्ये यात्रेच्या तीन दिवस अगोदर व यात्रेच्या मुख्य दिवशी असे चार दिवस परिसरातील जमीन राखीव ठेवावी अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्या अनुषंगाने नेमक्या किती क्षेत्रात यात्रा भरवली जाते? असा प्रश्न शासनाकडून करण्यात आला होता त्या अनुषंगाने आज एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी परिसराची पाहणी केली व जवळपास तीस एकरावरील क्षेत्रामध्ये यात्रा भरवली जाते असे नमूद केले. सदर यात्रेसाठी क्षेत्र राखीव करण्यासाठी शासनाकडे पाठपुरा करून येणाऱ्या यात्रेमध्ये जागा राखीव करण्यासाठी शासनावर दबाव आणला जाणार आहे असे श्री अहिरे यांनी यावेळी म्हटले.
त्यामुळे नेमके किती क्षेत्र यात्रेसाठी राखीव होते याकडे राज्यातील भिल्ल समाजाचे लक्ष लागले आहे .यावेळी येडूबाई अनुदान कमिटीचे संपर्कप्रमुख राधाकृष्ण बर्डे, आष्टी तालुका अध्यक्ष शंकर बर्डे, प्रख्यात गायिका सविता दादेगावकर, हौसाराम बर्डे, गणेश बर्डे, अनिता माळी, सुरज माळी, परसराम गोधडे, राजेंद्र पिंपळे, निवृत्ती पवार, दीपक बर्डे, संतोष गांगुर्डे, अश्विनी बर्डे, छाया साळुंखे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments