राहाता तालुक्यातील राजुरी येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अशा विविध प्रदर्शनात भाग घेऊन आपल्या कलागुणांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ सुष्मिता विखे पाटील यांनी केले. राहाता तालुका पंचायत समिती व राहता तालुका गणित विज्ञान प्रदर्शन व कला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राहता तालुका गणित विज्ञान पर्यावरण व कला प्रदर्शन 2025 चा उद्घाटन समारंभ श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला.
हे प्रदर्शन मंगळवार दि 16/ 12/ 25 ते बुधवार दि. 17/ 12/ 25 या दोन दिवस मुलांसाठी खुले राहणार असून या उद्घाटन प्रसंगी डॉ सुष्मिता विखे पाटील यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक व संयोजकांना शुभेच्छा देत प्रदर्शनाचे उद्घाटन केले या कार्यक्रमासाठी राजेश पावशे गट शिक्षण अधिकारी, मा लीलावती सरोदे मॅडम शिक्षण संचालिका, श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील गोरे, प्रवरा सहकारी बँकेचे तज्ञ संचालक एडवोकेट काकासाहेब गोरे,राजुरी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ संगीता पठारे, मा विष्णू कांबळे कानिफनाथ कोळेकर विद्यालयाच्या प्राचार्य डॉ माधुरी सातपुते, मेजर रमेश रोकडे, भास्करराव कदम,बाबासाहेब कदम,आर डी कदम,बाळासाहेब भालेराव,जालिंदर पठारे,आप्पासाहेब लाळगे,अण्णासाहेब लाळगे,मा दहिफळे साहेब,राहता तालुका गणित विज्ञान संघाचे अध्यक्ष डॉ संदीप म्हस्के उपाध्यक्ष पंकज दर्शने, प्रवरा कला प्राध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र तुपे सर्व केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी मुख्याध्यापक प्राचार्य तसेच विविध विद्यालयाचे शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाची सूचना उंबरकर सर यांनी मांडली तर अनुमोदन कलाशिक्षक राजेंद्र तुपे यांनी दिले सूत्रसंचालन सुनील कोळपकर सर यांनी केले या कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष पंकज दर्शने मांनले यावेळी गट शिक्षणाधिकारी गणेश पावशे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.प्रवरा शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच राहता तालुक्यातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही या गणित विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला आहे.मंगळवारी या गणित विज्ञान प्रदर्शनाचा समारोप तसेच बक्षीस वितरण होणार आहे.विद्यालयामध्ये असणाऱ्या विविध विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केलेल्या उपक्रम व प्रदर्शनाची पाहणी डॉ सुष्मिता विखे पाटील यांनी केली.
फोटो राहाता तालुका गणित विज्ञान प्रदर्शनाचे राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात उद्घाटन डॉ सुष्मिता विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवर दिसत आहे.(छायाचित्र संतोष गोरे राजुरी)
0 Comments