शिर्डी येथे साई संस्थानच्या वतीने भारताचा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा!

शिर्डी- (राजकुमार गडकरी)-
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने ८० व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त सकाळी ०८.१५ वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍या हस्‍ते शैक्षणिक संकुलाच्‍या क्रीडांगणावर राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करण्‍यात आले.


 यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, संदीपकुमार भोसले, कार्यकारी अधिकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्‍य लेखाधिकारी मंगला व-हाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, वैद्यकिय संचालक डॉ. प्रितम वडगावे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, संस्‍थान कर्मचारी, शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. गाडीलकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा प्रशिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवे उपक्रम राबविण्याची घोषणा केली. 
तसेच, श्री साईबाबांविषयी दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधातील संस्थानच्या कायदेशीर लढ्याला मोठे यश प्राप्‍त झाले असून दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर GAC कडून संबंधित व्हिडीओ व लेख २४ तासांत हटविण्याचे आदेश जारी झाले असलेबाबत माहिती दिली व मा. उच्‍च न्‍यायालयाचे तसेच या कायदेशीर लढाईत संस्थानची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील प्रमोद कुमार दुबे व त्‍यांचे सहकारी यांचे आभार व्‍यक्‍त केले.
त्‍यानंतर शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशु लोकेगांवकर व विद्यार्थ्‍यांनी देशभक्‍तीपर गीत सादर केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कन्‍या विद्या मंदिरचे उपाध्‍यापक वसंत वाणी व क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments