दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९--पतीचा त्रासाला कंटाळून 33 वर्षीय विवाहितेने मित्राच्या मदतीने दोरीने गळा आवळून पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना सोयगाव पोलिसांच्या तत्परतेने शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी मयताच्या पत्नीसह साथीदाराच्या शुक्रवारी रात्री नऊ वाजता मुसक्या आवळून दोघांना अटक करून शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि
१० सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनवली आहे या घटनेमुळे बनोटीसह परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तालुक्यातील बनोटी येथील साठे नगर भागात दि.१८ जुलै रोजी गोपाल श्यामराव बोरसे (वय -३८) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करून पत्नी ज्योती गोपाल बोरसे व तिचा साथीदार गणेश वसंत शिंदे यांनी गळा आवळून शव घराच्या मागील पत्राच्या खोलीत लोखंडी अँगलला लटकवून पती गोपाल श्यामराव बोरसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला मात्र सोयगाव पोलिसांना संशय होताच त्या दिशेने पोलिसांनी तपासाचे चक्र सुरु केले होते. दि.१८ जुलै रोजी झालेल्या गोपाल बोरसेचे शवविच्छेदन करण्यात आले होते त्या शवविच्छेदन अहवालची सोयगाव पोलिसांना प्रतीक्षा होती वैद्यकीय अधिकारी यांनी गुरुवारी दिलेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये सदर व्यक्तीचा गळा आवळून श्वास रोखून धरल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिल्या वरून सोयगाव पोलिसांनी शुक्रवारी घटना स्थळाचे पाहणी केली असता मयंताची पत्नी ज्योती गोपाल बोरसे हिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता मयत गोपाल बोरसे हा दारू पिऊन मुलांना व पत्नी ज्योती हिस त्रास देत असल्याचा कबुली जबाब ज्योती बोरसे यांनी दिला यावरून सोयगाव पोलिसांनी व तांत्रिक बाबींचा वापर करून पत्नीनेच मित्राच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला व पतीच्या आत्महत्येचा बनाव केल्याचे उघड झाले. यावरून सोयगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आकास्मिक मृत्यू ची नोंदची खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करून पत्नी ज्योती गोपाल बोरसे-(वय ३३)व साथीदार मित्र गणेश वसंत शिंदे (वय -३५)या दोघांना अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित काईगडे यांनी रात्री उशिरा घटना स्थळी भेट दिली पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी उपविभागीय अधिकारी विश्वजित काईगडे, पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, उपनिरीक्षक गजानन आरेकर गजानन दांडगे अजय कोळी, राजू बर्डे संजय सिंगल, सादिक तडवी,संदीप सुसर आदी तपास करत आहे.
0 Comments