लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातीललोहगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ.भाऊसाहेब पवार म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर झाला .मात्र त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही. त्यांच्या अनेक साहित्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.
वेगवेगळ्या साहित्यावर माहिती दिली त्याचप्रमाणे एक ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करावा. असा महाराष्ट्र शासनाने जो आदेश जारी केला त्याबद्दल शासनाचे अभिनंदन व आभार मानण्यात आले. यामुळे शाळा, विद्यालय ,सार्वजनिक संस्था ,महाविद्यालय यामध्ये विद्यार्थ्यांना निश्चितपणे एक प्रेरणा घेण्यासारखं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना देखील यातून काहीतरी शिकता येईल अशी भूमिका सरकारने या ठिकाणी घेतलेली दिसते. या प्रसंगी भाऊसाहेब पाटील चेचरे तज्ञ संचालक ,पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील. गुलाबराव भडकवाड, उपसरपंच दौलत पाटील चेचरे, सुरेश पाटील चेचरे, अशोक पाटील चेचरे, शांताराम पाटील चेचरे, जेष्ठ पत्रकार, कोंडीराम पा.नेहे ,हरिभाऊ दुशिंग,प्रवीण खवळे, संजय सुरडकर ,तुकाराम शिंदे ,गोरख पगारे, संदीप ठोंबरे ,शशिकांत ठोंबरे ,गुलाब भाई शेख ,नजीर शेख ,समीर सय्यद ,भाऊराव येवले ,रवी रोकडे ,साळवे मामा मच्छिंद्र पवार याप्रसंगी उपस्थित होते .या कार्यक्रमात भाऊसाहेब पाटील चेचरे आणि श्री कडू बाळ तुपे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि कार्य यांची माहिती दिली. हा जयंती उत्सव पार पाडण्यासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बबनराव ठोंबरे, उपाध्यक्ष देविदास पवार, सचिव ज्ञानेश्वर पगारे , खजिनदार अशोक खरात , सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले प्रथमतः सकाळच्या सत्रात जिल्हा परिषद शाळेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या ,पेन, खाऊ ,वाटप करण्यात आले.
0 Comments