पत्रकार दादासाहेब म्हस्के व डॉ रवींद्र विखे यांचा सत्कार.



 राजुरी विजय बोडखे ( वार्ताहर ) राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील दैनिक सार्वमतचे ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के यांना जिल्हास्तरीय स्वर्गीय वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल येथे उप प्रबंधक पदी,डॉ. रवींद्र विखे यांची निवड झाल्याबद्दल यावेळी या दोन्ही मान्यवरांच्या शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ तसेच वृक्ष देऊन लोणी बु येथील मित्र परिवाराच्या वतीने व प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा लोणी बु येथे सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी प्रा. बाळासाहेब विखे, डॉ. प्रकाश म्हस्के,परशुराम विखे,राजेंद्र म्हस्के छायाचित्रकार दिलीप धावणे,अंकुश धनवटे, राजेंद्र काळे, इंद्रभान पाबळ,शांतीनाथ विखे, विठ्ठल शेट्टी,निलेश दिवटे ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे,प्रवरा प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय बोडखे, पत्रकार शंकर सोनवणे ज्ञानदेव कळमकर,नकुल कटारे,राजू वाणी,योगेश कडू,अविनाश म्हस्के.यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments