लोहगाव (वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. संकुलाचे प्राचार्य दिलीप डहाळे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, पर्यवेक्षिका संगीता सांगळे आणि शिक्षकांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संगीता उगले यांनी केले.
यावेळी डॉ. शरद दुधाट व प्राचार्य दिलीप डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य दिलीप डहाळे यांनी आपल्या मनोगतातून दोन्ही महनीय व्यक्तींच्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी त्यांचे आचार विचार अंगी बाळगावेत, अशी इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी प्र. उपप्राचार्य संजय डुबे, शिवाजी काळे, संजय ठाकरे, देवेश आहेर, माधुरी वडघुले, रविंद्र मेढे, विलास गभाले, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. शेवटी नरेंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. सूत्रसंचालन संगीता उगले यांनी केले. कार्यक्रमानंतर तीनही विभागातील विद्यार्थ्यांनी मैदान व विद्यालय इमारत परिसरात श्रमदान केले, तर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले.
0 Comments