महाराष्ट्रातील महत्वपुर्ण (बेलापूर) श्रीरामपूर-परळी रेल्वे लाईन प्रकल्पाला केन्द्राची मंजूरी-


 

टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर-परळी रेल्वे लाईन बाबत शिर्डी लोकसभा मंतदार संघांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आतारांकित प्रश्न क्र 871 च्या माध्यमातुन प्रश्न विचारला असता रेल सूचना व प्रसारण मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिल्याचे स्पष्ट केले . त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर परळी रेल्वे मार्ग बाबत प्रश्न उपस्थित केला असता रेल्वे मंत्री यांनी सध्याचे बेलापूर (श्रीरामपूर) आणि परळी स्थानक अंकीया, जालना तसेच परभणी मार्गांशी जोडलेले आहेत तसेच बिड मार्गे बेलापुर (श्रीरामपूर) आणि परळी वैजनाथ यांच्यात अतिरिक्त संपर्क प्रस्थापित करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती केन्द्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तरात दिल याशिवाय महाराष्ट्र राज्यात रेल्वे पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी खालीलप्रमाणे काम सुरु करण्यात आली आहेत.

अहिल्यानगर-बीड-परळी नवीन रेल्वे लाईन (२६१ किमी),
बारामती-लोणंद (६४ किमी),
इंदौर-मनमाड (३६० किमी),
जालना-जळगांव (१७४ किमी),
कल्याण-कसारा तिसरी लाईन (६८ किमी),
वर्धा-बल्लारशहा तिसरी लाईन (१३२ किमी)
राजनांदगांव-नागपूर तिसरी लाईन (२२८ किमी),जळगांव-मनमाड चौथी लाईन(१६०किमी),सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन लाईन (९५ किमी) वर्धा-नदिड (२८४ किमी),बडसा-गडचिरोली (५२ किमी),दौंड-मनामाड दुहेरीकरण (२३६ किमी),वर्षा-नागपूर तिसरी लाईन (७६ किमी), इटारसी-नागपूर तिसरी लाईन (२८० किमी), वर्धा-नागपूर चौथी लाईन (७९ किमी),भुसावळ-खंडवा तिसरी व चौथीलाईन (१३१ किमी),महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ऐकून (५८,९४२ कोटी) रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित असले तरी या प्रकल्पांच्या अंमलबजावणी साठी भू-संपादन, वन परवानग्या, विविध विभागांची मान्यता, कायदा सुव्यवस्था, भौगालिक परिस्थिती आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेअभावी रखडत असल्याचेही केन्द्र सरकारच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकल्पांचा पुनरावलोकन करुन स्पष्ट वेळापत्रक, पारदर्शक निधी वितरण आणि नियमित प्रगती अहवाल जनतेसमोर सादर करणे आवश्यक असल्याचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments