सोयगाव तालुक्यात पोलिसांचे पथसंचालन,जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलीस अलर्ट-



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०५-जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बुधवारी आमखेडा गटासह जरंडी, निंबायती,बहुलखेडा, तिडका,बनोटी आणि गोंदेगाव या सात गावात सोयगाव पोलिसांनी पथसंचालन केले.


 दंगा काबू पथकासह सोयगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर यांच्या नेतृत्वाखाली दंगा काबू पथक,स्थानिक कर्मचारी सादिक तडवी, अजय कोळी,गजानन दांडगे,श्रीकांत तळेगावे,आदींसह तीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने आमखेडा, जरंडी, बनोटी, गोंदेगाव या प्रमुख गावांसह सात गावात पथसंचालन घेतले तालुक्यात मतदान कालावधीत कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी सोयगाव पोलीस अलर्ट झाले आहे. दरम्यान मतदान कालावधीत कोणीही कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments