राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अमरदीप युवक संघटनेचे कार्यकर्ते दत्तात्रय जिजाबा आगलावे यांची नुकतीच निवड झाल्याने त्यांचा अमरदीप युवक संघटनेच्या वतीने नुकताच श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ओमेश साहेबराव जपे हे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे,पं.स.मा. सभापती जिजाबा आगलावे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे, गणेश बनसोडे, सोसायटीचे व्हा. चेअरमन सुरेश वाघमारे, संचालक सुनील आगलावे, संचालक राजकुमार गडकरी, बाबासाहेब जपे, संतोष पळसे,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रथम नूतन उपसरपंच दत्तात्रय आगलावे यांनी येथील सर्व मंदिरांत दर्शन घेतले. नंतर यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना सरपंच ओमेश साहेबराव जपे यांनी म्हटले की, अमरदीप संघटना गेल्या पन्नास वर्षापासून सामाजिक व सर्व क्षेत्रात नेहमी सक्रिय असून विविध कार्यात संघटनेची आम्हालाही मोठी मदत नेहमी मिळत असते. हरिनाम सप्ताह असो की, श्री साई चरित्र पारायण असो किंवा दिंड्या तसेच गणेशोत्सव आदी सर्वांमध्ये संघटनेचे कार्य मोठे आहे. यावेळी अमरदीप संघटने कडून हरिनाम सप्ताह काळात एक पंगत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संमतीने जाहीर केले. तसेच बाजार तळामध्ये केलेल्या वृक्षारोपणाची जबाबदारी संघटनेने घेतली असून संघटनेचे खरोखरच अभिनंदन आहे. असे सांगत उपसरपंचपद निवडणुकीत आपल्यावरही मोठा प्रेशर होता. पण दिलेला शब्द प्रमाण मानून शब्दाला जागत आपण या निवडणुकीत काम केले असेही त्यांनी यावेळी सांगितले.तर शांताराम जपे यांनी सांगितले की, सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतची यापूर्वी झालेली निवडणूक ही बिनविरोध होण्यासाठी आमचा प्रयत्न होता. तशी त्यावेळी बैठक होऊन तडजोडी होऊन उपसरपंचाचा शब्द जिजाबा आगलावे यांना देण्यात आला होता. या शब्दाला जागत आम्ही अनेक प्रकाराने दबाव आला तरी तो शब्द हा प्रमाण मानून दत्तात्रय आगलावे यांना उपसरपंच सर्वांच्या सहकाऱ्यांनी केले व सर्वांनी त्यासाठी मोठी मदत केली. त्या सर्वांचेही त्यांनी धन्यवाद मानले. अमरदीप संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे विविध संस्थेवर निवडून गेले हा संघटनेचा अभिमान आहे असेही त्यांनी सांगितले. तर जिजाबा आगलावे यांनी अमरदीप संघटनेने आतापर्यंत आम्हाला सर्व काही दिले आहे. आताही मुलगा दत्तात्रय यांना उपसरपंच करण्यासाठी अमरदीप संघटनेचे मोठे सहकार्य मिळाले. हे मी कधीच विसरू शकत नाही असे सांगत हा संघटनेने ठेवलेला सत्कार खूपच मोलाचा असल्याचे म्हणत सर्वांचे धन्यवाद मानले.
या बैठकीत प्रथम प्रास्ताविक सुनील आगलावे यांनी केले. त्यांनी यावेळी म्हटले की,अमरदीप संघटनेचे कार्यकर्ते दत्तात्रय आगलावे यांची उपसरपंच पदी निवड झाली. हा संघटनेच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण असून यापुढे गावच्या विकासासाठी व संघटनेच्या प्रत्येक कार्यासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य मिळणार असल्याचे सांगत त्यांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन आहे.व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा आहेत .त्यानंतर नूतन उपसरपंच दत्तात्रेय जिजाबा आगलावे यांचा संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत सोसायटीचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन उपसरपंच दत्तात्रय आगलावे यांनी सत्कार केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले.या कार्यक्रमाला राजेंद्र सोपानराव आगलावे, सुभाष फाजगे, सुनील गायकवाड, भीमा वर्पे, दिलीप कापसे,अशोक कुऱ्हे, बंटी उर्फ ऋषिकेश जाधव, निलेश आरणे, संजय वाघमारे, भारत नेतकर, भाऊसाहेब सातदिवे, सिद्धार्थ रणधीर, रवी बनकर, परसराम जपे, रवींद्र पळसे, पोपट जपे, रवी कापसे, दत्तू आरणे, आदींसह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
0 Comments