दिलीप शिंदे
सोयगाव दि.०७-- सन २०२५-२०२६ या वर्षात उत्कृष्ट कार्य केलेल्या सोयगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संभाजीराव देशमुख व सहाय्यक महसूल अधिकारी गोपीनाथ जयवळ यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
दरम्यान सन २०२५-२०२६ या वर्षांत उत्कृष्ट कार्य केलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील अधिकारी,कर्मचारी यांचा गौरव सभारंभ कार्यक्रम दि.०७ शुक्रवारी रुक्मिणी हॉल, महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त डॉ. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, अप्पर जिल्हाधिकारी अडकूने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. प्रमुखांच्या हस्ते सोयगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संभाजीराव देशमुख व सहाय्यक महसूल अधिकारी गोपीनाथ जयवळ यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी कार्यक्रमास जिल्ह्यातील तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब तहसीलदार संभाजीराव देशमुख व सहाय्यक महसूल अधिकारी गोपीनाथ जयवळ यांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आल्याने सोयगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार काकासाहेब साळवे, शरद पाटील,महेंद्र पवार, उज्वला वामने,संजय ताले, राहुल जयवळ, संजय नावकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे, शिवसेना उप जिल्हाप्रमुख (उबाठा) दिलीप मचे, ईश्वर इंगळे,अनिल लोखंडे,केतन शिंदे, दीपक फुसे,राहुल शिंदे, संतोष सोनवणे,गणेश धुमाळ आदींनी अभिनंदन केले.
0 Comments