टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे विशेष आकर्षण म्हणजे ग्रामस्थांच्या वतीने प्रथमच एकल महिलांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.
या निर्णयातून एकल महिलांचा सन्मान आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समान स्थान देण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
टाकळीभान ग्रामपंचायत येथे मंगल रामकृष्ण जाधव व सुनिता बापुसाहेब चौधरी, मराठी शाळेत शकुंतला रावसाहेब पटारे व रंजना रावसाहेब पवार, लक्ष्मीवाडी शाळेत मंगल डॅनियल खरात व आशाबाई रामभाऊ सटाले, बनकर वस्ती शाळेत अनिता बाबासाहेब लोखंडे व अश्विनी रवींद्र म्हस्के, तर दाभाडे वस्ती शाळेत सोनाली सागर आसने-लांडगे व राणी जॉन रणनवरे या एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
एकल महिलांना स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान देण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
तसेत टाकळीभान सेवा सोसायटीमध्ये नवनियुक्त चेअरमन राहुल पटारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल महेश बडाख,पो कॉ, नितीन पटारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments