दिलीप लोखंडे
टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील रमेश गिताराम तगरे यांना नूकतेच कारागृह विभागामध्ये बजावलेल्या प्रशंसनीय सेवेबद्दल पदक व सन्मानचिन्ह सन्मानीत करण्यात आले.
रमेश तगरे हे कारागृह (तुरुंग) विभाग मध्ये २००० साली भरती होऊन ठाणे सेन्ट्रल जेल, मुंबई सेंट्रल जेल, तळोजा सेन्ट्रल जेल याठिकाणी आरोपींना सोबत राहून सुद्धा खूप प्रमाणिक सेवा करुन आज त्यांना सन्मानीत करण्यात आले. सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात हवालदार या पदावर कार्यरत आहे.
कारागृह विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा सुहास वारके यांच्या हस्ते, व योगेश देसाई कारागृह महानिरीक्षक, नितिन वायचळ तुरूंगाधिकारी, श्रीमती राणी भोसले अधिक्षक ठाणे कारागृह, सुभाष निर्मळ विसापूर कारागृह अधिक्षक यांच्या उपस्थितीत पदक व सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पोलीस वतृळातून तसेच श्रीरामपूर तालुका व टाकळीभानसह पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
0 Comments