दिलीप शिंदे
सोयगाव दि.१२- सोयगाव येथील तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम. बी.पाटील व सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनाजी खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ शुक्रवारी दिवाणी न्यायालयात आरोग्य तपासणी व आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सावळदबारा पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश चव्हाण हे होते. तर डॉ. शितल डोके, औषध निर्माता आकाश चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी दिवाणी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित महिलांना आरोग्य विषयी घ्यावयाची काळजी याविषयी राष्ट्रीय बाल स्वास्थ पथकाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल डोके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी उपस्थितांची आरोग्य तपासणी केली.यावेळी ॲड.आर.एस. महाजन, ॲड.वाय.आर.जावळे, सोयगाव येथील दिवाणी न्यायालय सहाय्यक अधीक्षक एस.एल. पैठणकर, लघुलेखक वाय.एस.माळी,एन.पी.ताडे, एस. जी. तोंगल, कनिष्ठ लिपीक जी.एस.सुरुशे, डी.पी. घोंगडे, बेलीफ आर.सी. महाजन, शिपाई डी.आर.महेर,दिलीप शिंदे आदींसह महिला उपस्थित होत्या.
0 Comments