शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बाभळेश्वर येथे बेंद्रे पाटील उद्योग समूहाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !

                

   बाभळेश्वर (वार्ताहर ) सत्तेचा महासंग्राम डिजिटल मिडिया 

शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बेंद्रे पाटील उद्योग समूहाच्या वतीने बाभळेश्वर येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.   
                            राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बेंद्रे पाटील उद्योग समूह यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी माजी खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांनी ही उपस्थित राहून युवकांचे मनोबल वाढवले,

रक्तदान शिबिरासाठी युवकांचा उत्सुक प्रतिसाद मिळाला असून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बेंद्रे पाटील उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अण्णासाहेब बेंद्रे, विखे कारखान्याचे माजी चेअरमन तुकाराम बेंद्रे , राहता पंचायत समितीचे माजी उपसभापती बबलू म्हस्के,माजी संचालक साहेबराव म्हस्के यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ,प्रवरा बँकेचे संचालक शंकरराव बेंद्रे प्रवरा बँकेचे माजी संचालक दादासाहेब म्हस्के, ज्येष्ठ नेते तानाजी बेंद्रे, पत्रकार गोरख दादा गवारे, माजी उपसरपंच अजित बेंद्रे, तिसगाव ग्रामपंचायतचे सरपंच नानासाहेब डोंगरे, युवा उद्योजक निखिल कडू, बंडू कडू, माजी उपसरपंच शहाजी कोकाटे यांनी रक्तदान केले, संकेत कडू, बेंद्रे पाटील उद्योग समूहाचे भागवत बेंद्रे,रवींद्र बेंद्रे, अमोल बेंद्रे, विशाल बेंद्रे, मिनीनाथ बेंद्रे, दीपक बेंद्रे व व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments