शिर्डी ( प्रतिनिधी)-धर्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे; तो राष्ट्राच्या जीवनमूल्यांचा, कर्तव्यभावनेचा आणि नीतीचा आधार आहे. ज्या राष्ट्राच्या नागरिकांच्या आचरणात धर्माचे तत्व—सत्य, करुणा, शौर्य, संयम, कर्तव्यपालन आणि परस्पर सन्मान—मूळ धरतात, ते राष्ट्र आपोआप सुदृढ आणि विजयी बनते. असे मत श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की,
धर्म जनमानसात नैतिक शक्ती निर्माण करतो. ही नैतिक शक्ती समाजात एकता, शिस्त, परस्पर विश्वास आणि बलिदानभाव निर्माण करते. अशा समाजाची रचना मजबूत होते आणि राष्ट्र कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाते.
इतिहास साक्ष देतो की धर्माधिष्ठित राष्ट्रे युद्धात, संस्कृतीत, विज्ञानात आणि व्यवस्थेत उंच भरारी घेतात. धर्म व्यक्तीला सदाचारी बनवतो, सदाचारी व्यक्ती समाज उभारते आणि मजबूत समाज राष्ट्राला विजयाकडे नेतो.
म्हणूनच असे म्हणतात—धर्म के कारण राष्ट्र विजयी होत आहे, कारण धर्म राष्ट्राच्या अस्तित्वाला दिशा, शक्ती आणि अपरिमित प्रेरणा देतो. असे महंत श्री नर्मदेश्वर संन्याशी आत्माराम गिरी महाराज यांनी म्हटले आहे.
0 Comments