दिलीप शिंदे
सोयगाव दि. ८--- सिल्लोड तालुक्यातील बहुली येथील कडुबा शिनगारे यांचे वार्धक्याने निधन झाले होते.
त्यांच्या रक्षेच्या विधिनिमित्त पर्यावरण प्रेमी गावातील निसर्ग स्नेही नागरिकांनी त्यांच्या रक्षेचे शेतात विसर्जन करून त्या ठिकाणी कदंब, आंबा, लिंब, जांभूळ इ. वृक्षांचे रोपण करून प्रिय जणांच्या स्मृती जपण्याचा एक संदेश समाजास दिला आहे. गावातील अंकुश शिनगारे, अर्जुन शिनगारे,विजय सोन्ने, बळीराम शिनगारे, अतुल शिनगारे, श्रीराम कऱ्हाळे, सांडू बोरमळे, संजय बोर मळे, कृष्णा लांडगे, भाऊ साहेब निकोद,परशुराम तुपे इ. नागरिकांनी पुढाकार घेतला.
0 Comments