शेतकऱ्यांचे प्रश्न मिटल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत... रघुनाथ दादा पाटील (शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष) (१२ डिसेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर शेतकरी संघटनेचा विविध मागण्यासाठी मोर्चा)

दिलीप लोखंडे 

टाकळीभान: शेतकऱ्यांचे प्रश्न मिटल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही असे उद्गार शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी टाकळीभान येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भेटी प्रसंगी काढले. यावेळी समवेत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड अजितराव काळे, शेतकरी संघटनेचे लक्ष्मणराव वडले, शिवाजी नाना नादखिले, साहेबराव चोरमल, डॉ.आदिक आदी सह राज्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रघुनाथ दादा पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की गेल्या १२ वर्षापासून सरकारच्या शेतकऱ्यांबद्दल धोरणात कोणताही बदल झालेला नसून शेतकऱ्यांच्या जीवनमानात कोणताही बदल झालेला नसून सरकार राजकारणाच्या सोयीसाठी शेतकऱ्यांना लुटत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचे नेते स्व. शरद जोशी यांच्या स्मृति दिनानिमित्त १२ डिसेंबर रोजी साखर आयुक्तालय पुणे येथील  कार्यालयावर शेतकरी संघटना राज्यव्यापी मोर्चा काढणार असून शेतकऱ्यांच्या उसाला ७५००/- भाव मिळावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, कारखान्यातील अंतराची अट शासनाने रद्द करावी, तसेच साखर आयुक्तालयाचे नाव बदलून ऊस आयुक्तालय करावे या मोगण्यांसाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असून शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
          यावेळी ॲड अजित काळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे तरुण युवक शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद शेतकरी संघटनेला असून यामुळे शेतकरी संघटनेला बळकटी येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी लक्ष्मणराव वडले यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली असून शेतकऱ्यांवरील होणारा अन्याय शेतकरी पुत्र सहन करणार नसून शेतकऱ्याच्या हक्काचा घामाचा दाम शेतकरी मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे सांगितले. यावेळी प्रथमता शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून स्वागत टाकळीभान येथील शेतकरी  बांधवांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी काही शेतकऱ्यांनी आपल्या समस्या शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांसमोर मांडल्या.यावेळी भाऊसाहेब गव्हाणे,इंद्रजीत मगर, महेश मगर,पांडुरंग मगर,दिगंबर मगर, रवींद्र पवार, पवन मगर, योगेश नवघणे, ज्ञानेश्वर कोकणे,मनोज मगर, मयूर मगर, अनिल बोडखे,सचिन रणनवरे, रामेश्वर आरगडे, , भाऊसाहेब पवार आदी सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


१२ डिसेंबर रोजी साखर आयुक्तालय पुणे यावर शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यव्यवती मोर्चा काढणार असून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या रोशास सरकारला सामोरे जावे लागेल... रघुनाथ दादा पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी संघटना)

Post a Comment

0 Comments