सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतचा पुढाकार आर. ओ. फिल्टर व पिठगिरणीचे उद्घाटन, महिला बचत गटाकडे दिली जबाबदारी --



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०९ -महिलांना आर्थिक बळकटीकरण देण्यासाठी जरंडी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत उत्पन्न वाढीसाठी दि.०९ मंगळवारी शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आर ओ प्लॅन्टचे व पिठगिरणीचे उद्घाटन सरपंच स्वातीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थाना नाममात्र पिठगिरणीतुन दळण करून देण्यात येणार असल्याचे सरपंच स्वातीताई पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान ग्रामस्थांचे आरोग्य सदृढ व्हावे यासाठी वीस लिटर शुद्धपाणी नाममात्र शुल्क आकारून ग्रामस्थांना पुरविण्यात येणार आहे आर ओ प्लॅन्ट आणि पिठगिरणी चालविण्यासाठी गावातील जय भवानी बचत गटाच्या अध्यक्ष धृपताबाई सोनवणे यांना दिली आहे. यातून महिला सक्षमीकरण होण्यासाठी बचत गटाकडे ही कामगिरी सोपविली असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांनी सांगितले यावेळी उपसरपंच संजय पाटील,विस्तार अधिकारी सुनील राकडे, दिलीप पाटील,अमृत राठोड, माजी पंचायत समितीचे सदस्य संजीवन सोनवणे, मधुकर पाटील,मधुकर सोनवणे, सिद्धार्थ मोरे, श्रीराम पाटील,भिवा चव्हाण, माधव मोहिते,सोयगावचे माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील,शिवसेना महिला आघाडीच्या धृपता बाई सोनवणे, आदींची उपस्थिती होती सतिष बाविस्कर, संतोष पाटील,भास्कर निकम् आदींनी पुढाकार घेतला होता.

Post a Comment

0 Comments