बाभळेश्वर(वार्ताहर) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील राहुल संपतराव कटारिया यांची भारतीय जैन संघटनेच्या बाभळेश्वर शाखेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जैन संघटनेच्या वतीने बाभळेश्वर येथे सर्व जातीधार्माना एकत्र घेवून सर्वसमावेशक कार्य करावे अश्या शुभेच्छा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तुकाराम बेंद्रे, प्रवरा बँकचे संचालक शंकर बेंद्रे, जेष्ठ नागरिक तानाजी बेंद्रे, भारतीय जैन संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र गदिया, रयतचे विभागीय निरीक्षक प्रमोद तोरणे, माहिती अधिकार कार्यकर्ते गोरखदादा गवारे, ज्ञानदेव लहानू बेंद्रे, बापू भोसले, आयुब शेख, संदीप बेंद्रे, ज्ञानदेव खंडागळे आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments