टाकळीभानमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात


दिलीप लोखंडे 

टाकळीभान (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी शशिकांत गाढे व सौ, सुमन गाढे, दाम्पत्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

 तर ग्रामपंचायत मध्ये रिपाईचे नेते आबासाहेब रणनवरे, लक्ष्मीवाडी शाळा मध्ये ग्रामपंचायतच्या सदस्य कांदिला गायकवाड,वस्ती शाळेमध्ये तुषार रमेश थोरात दाभाडे वस्ती शाळेत, सतीश अण्णासाहेब दाभाडे, 

 तसेच टाकळीभान पोलीस दूर क्षेत्र या ठिकाणी हे, कॉ, सचिन कुमार बैसाणे, आदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद लक्ष्मी शाळा,  बाजार समिती विविध ठिकाणी ध्वजारोह करण्यात आले,

यावेळी व्यासपीठावर  स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राहुल पटारे, मंजाबापू थोरात, मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे, सनसाकाचे विलास दाभाडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. शिंदे, पर्यवेक्षक एस.एस.

जरे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments