श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न ---


 

दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.२६-- तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची (आमखेडा, ता.सोयगाव, जि.छत्रपती संभाजीनगर) ची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२६ शुक्रवारी सोयगाव-जरंडी रस्त्यावरील हॉटेल अमृत बाग येथे खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनीताई काळे व गोंदिया येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्याहस्ते श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली.
सभे वेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील यांनी सभासदांसमोर संस्थेचा लेखजोखा मांडला.

यावेळी संस्थेच्या व सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. या वार्षिक सर्व साधारण सभेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोयगावचे व्यवस्थापक धीरज भुरे, डॉ मलहान पटेल, आमखेडा ग्रामपंचायत प्रशासक नंदा आगे, आमखेडा माजी सरपंच गजानन ढगे, पत्रकार दिलीप शिंदे, योगेश बोखारे, विजय काळे, सुलेमान शेख, उबाठा चे तालुका प्रमुख दिलीप मचे, निंबायतीचे सरपंच राजु पाटील, धनसिंग राठोड, कंकराळा सोसायटी माजी सभापती रवींद्र पाटील, गलवाडा माजी सरपंच सुरेखा तायडे, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक बन्सीलाल बेडवाल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रमेश जाधव निवृत्त कर्मचारी प्रदीप रोकडे,कै. बाबुरावजी काळे पतसंस्थेचे व्यवस्थापक सीताराम गोतमारे, भैरवनाथ पतसंस्थेचे व्यवस्थापक गोविंदा औरंगे, तिरुपती अर्बन बँकेचे व्यवस्थापक विकास देसाई, सामाजिक कार्यकर्त्या व संस्था संस्थापक संचालिका श्रीमती विमलबाई निकम, देविदास पाटील, आमखेडा पोलीस पाटील अंबादास ढगे, कडुबा ठाकरे, दत्तू रोकडे, दत्ता गाडेकर, ग्रामीण बँक जरंडीचे ज्ञानेश्वर सुस्ते, अमृतबाग हॉटेलचे संचालक शुभम गिरी, संस्थेचे अध्यक्ष ॲड राजेश गिरी, उपाध्यक्ष विष्णुशेठ दुसाने, संचालक आकाश वरकड, युवराज आगे, एस. टी. पाटील, बाबु पटेल, सतिश कोलते,अर्जुन बोडखे, राहुल गोसावी, रवि अप्पा इंगळे, अमोल निकम ,इतर पतसंस्थेचे कर्मचारी आदींसह प्रतिष्ठित नागरिक, संस्थेचे सभासद व खातेदार उपस्थित होते. प्रस्ताविक सतीश कोलते यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजेश गिरी यांनी मानले.उपस्थितांसाठी संस्थेकडून भोजन देण्यात आले. सभा यशस्वितेसाठी व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील कर्मचारी सुनिल सैंदाने, देवा बैरागी व गणेश पवार आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments