टाकळीभान प्रतिनिधी -- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान या गावातील स्टॅन्ड परिसरातील व्यावसायिक रोडच्या कडेला असणारी लोकांचे अतिक्रमण धारकांवर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचा वारंवार सांगून सुद्धा अतिक्रमण न काढल्याने अचानक दणका
बस स्टँड परिसरात असणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान समोर असलेले शेड व शेडच्या पुढे दुकानातील सामान लावण्याचे प्रमाण अधिकाधिकच वाटत चालल्याने पोलीस निरीक्षक धनवडे यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा व्यावसायिक ऐकत नसल्याने काल अचानक पोलीस पद संचलन करून रोडवर असलेल्या सामानाची धरपकड केल्याने व्यवसायिकांची चांगलीच नांदल उडाली तर रोडच्या मधोमध लावलेल्या गाड्यांचे काठीच्या सहाय्याने इंडिकेटर सुद्धा मोडण्यात आले.
अशा अचानक झालेल्या या मोहिमेमुळे स्टँड परिसरात अचानक धावपळ उडाल्याने व्यावसायिक चांगलेच दाखवले आहे परंतु पोलीस प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही व्यावसायिक ऐकत नसल्याने भविष्यात अचानक कधीही पोलीस प्रशासन रोडवर लावलेल्या गाड्या व दुकानातील साहित्य हे गाडीत भरून येतील व त्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशाराही पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी दिला आहे
टाकळीभान बस स्टँड परिसरातील चहाचे दुकान भेळीचे दुकान भांड्याचे दुकान चप्पल दुकानदार इलेक्ट्रिक दुकानदार अशा अनेकांना सूचना देऊन दुकाना समोरील अतिक्रमणे हटविण्यास सूचना दिले आहेत अचानक पोलिसांचा रुद्रावतार पाहून टाकल्यांमध्ये चांगलीच दानलोड आली होती अशाच कार्यवाहीची गरज असल्याची काही ग्रामस्थांमधून पोलिसांचे कौतुक करण्यात येत होते.
0 Comments