सावळीविहिर-- अहिल्यानगर महामार्गासाठी अर्ध नग्न पायी दिंडी सत्याग्रह करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना गावागावातून पाठिंबा देण्याची गरज--शिवसेना तालुकाप्रमुख संदीप विघे

शिर्डी ( प्रतिनिधी)
सावळीविहीर फाटा ते अहिल्यानगर हा रस्ता पुढे काम चालू, मागे खड्डे पडत असल्यामुळे सर्वांच्याच दृष्टीने मोठा त्रासदायक ठरत आहे. 

हा महामार्ग चांगल्या प्रकारे व्हावा. व अनेक वर्षापासून जनतेला या रस्त्यामुळे होणारा त्रास संपवावा या हेतूने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे‌ हे हाफ पॅन्ट म्हणजे अर्ध नग्न अवस्थेत पाठीला फलक लावून महात्मा गांधींच्या दांडीयात्रेप्रमाणेच अहिल्यानगरकडे शांततेच्या मार्गाने एक आगळे वेगळे आंदोलन करत पायी जात असून त्यांना या महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावातील, शहरातील दुकानदार, वाहनधारक, व नागरिकांनी पाठिंबा देऊन आपल्या परिसरात त्यांना पाठिंबा म्हणून काही अंतर त्यांच्या समवेत पायी चालत त्यांच्या या आंदोलनाला एक प्रकारे पाठबळ देण्याची गरज आहे. ते स्वतःसाठी नव्हे तर सर्वांच्या सोयीसाठी एक सामाजिक कार्य म्हणून हे अर्धनग्न पायी दिंडीचे सत्याग्रह आंदोलन करत आहे. त्यामुळे त्यांना गावोगाव तरुणांनी, ग्रामस्थांनी, वाहनधारकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याबरोबर काही अंतर चालून पाठिंबा द्यावा असे आवाहन राहता शिवसेना तालुकाप्रमुख संदीप रमेश विघे यांनी केले आहे.
त्यांनी म्हटले की , सावळीविहीर फाटा ते आहिल्यानगर हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या रस्त्याचे काम चालू असले तरी पुढे काम आणि मागे खड्डे पडत आहेत. असा निकृष्ट दर्जाचा रस्ता होत आहे. त्याच्या विरोधात कोणी आवाज उठवत नाही. पण सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या महामार्गासंदर्भात एक अनोखे आंदोलन हाती घेतले असून त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. कारण हा रस्ता चांगल्या प्रकारे होणे हे गरजेचे आहे. हा महामार्ग उत्तर- दक्षिण भारताला जोडणारा महामार्ग असून शिर्डी सारखे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र या मार्गावर आहे. मोठी वाहतूक या मार्गावर असल्यामुळे हा महामार्ग चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे व त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हे अनोखे असे आंदोलन करत असून त्यांना प्रत्येक गावागावात पाठिंबा देऊन शेवटच्या दिवशी अहिल्यानगर येथे मोठ्या संख्येने त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना एक प्रकारे मानसिक पाठबळ देण्याची गरज आहे. असे राहाता शिवसेना तालुकाप्रमुख संदीप रमेश विघे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments