लोणी :- (प्रतिनिधी - रूपाली भालेराव), ज्योतिषशास्त्र आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्योतिषतज्ज्ञ डॉ. ऋषिकेश राजेंद्र कुलकर्णी यांची 'भारत सेंटर फॉर व्होकेशनल ट्रेनिंग' (BCVT) यांच्या वतीने 'मानद डॉक्टरेट अवॉर्ड-२०२६' साठी अत्यंत मानाची निवड करण्यात आली आहे. रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे एका दिमाखदार आणि विशेष पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान त्यांना औपचारिकरीत्या प्रदान करण्यात आला.
या भव्य सोहळ्यात मानद डॉक्टरेटची पदवी आणि सन्मानचिन्ह स्वीकारतानाचा त्यांचा हा क्षण अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.
या पुरस्कारामागे डॉ. ऋषिकेश कुलकर्णी यांचे ज्योतिषशास्त्रातील प्रदीर्घ संशोधन, अभ्यास आणि त्यांचे सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील अमूल्य योगदान मुख्य ठरले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन BCVT तसेच 'युनिव्हर्सिटी ऑफ टेलोसा, मेक्सिको' आणि 'इंटरनॅशनल प्रोफेशनल अकॅडमी, युनायटेड किंगडम' यांच्या सहकार्याने हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता. सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना डॉक्टरेटचा हा बहुमान प्रदान करण्यात आला.
त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल आणि गौरवशाली कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक तसेच हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नाशिकसह सर्वत्र त्यांच्या या यशाचे कौतुक केले जात आहे.
सत्तेचा महासंग्राम --
प्रतिनिधी - रूपाली भालेराव
सहसंपादक - साबळे ज्ञानेश्वर
0 Comments