आदरणीय ॲड श्री प्रमोद दादा जगताप यांचे जीवनमान म्हणजे.... जगाच्या कल्याणा संताच्या विभूतीप्रमाणेच


वैजापूर (प्रतिनिधी)
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले* की आम्हा गावकऱ्यांना आदरणीय दादांसारखे आधारस्तंभ व कवच कुंडल असलेले भीष्म पितामह भेटले नव्हे नव्हे *आदरणीय श्री दादा म्हणजे आम्हा सर्वांच्या जीवनरथाचे भगवान श्रीकृष्णच आहे*
ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, *जेथ जेथ संपत्ती आणि दया*
*दोन्ही वसती आली या ठाया*
*तेथे जाण धनंजया विभूती माझी*
त्याचप्रमाणे वडिलोपार्जित ऐश्वर्यसंपन्न जिवन असतानाही गरीब श्रीमंत वा इतर कोणतीच दरी नसलेले व गर्वाचा लवलेशही नसलेले असे खरे स्वभाव सम्राट म्हणजेच आदरणीय दादा......

*स्वाभिमान अभिमान गरिबांची जाण आहे म्हणून तर आदरणीय दादांचे जिवनमान हे संता समान आहे* अगदी याप्रमाणे आपल्यासोबत असणाऱ्या गरिबांना ही गरीबाची जाणीव न होऊ देणारे असे प्रत्येकांच्याच मनामनात घर केलेले आधारस्तंभ म्हणजे आदरणीय दादा........
*माणसाने माणसाशी माणसासम वागणे* या प्रार्थने प्रमाणेच गावातील प्रत्येकालाच ते आपल्या स्वतःच्या कुटुंबातीलच सदस्य समजतात संसारी माणसाला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे कोणालाही कितीही मोठी अडचण आली तेव्हा *लाख अडचणी मात्र पर्याय एकच* तो म्हणजे आदरणीय दादा......‌‌
 जसे प्रदीप मिस्त्राजी म्हणतात की *सब समस्या का हल एक लोटा जल*
श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक समोरच्याला *भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे* अशी पाठीवरची थाप ही प्रत्येकाची इम्युनिटी पावर वाढणारी असते व ती दिलेली थाप कृतीत उतरणारे असे सर्वांचे कवच कुंडले म्हणजे आदरणीय दादा......
*आणि खरा देव माणूस तोच असतो की जो कुणालाही आपल्यासमोर झुकूच देत नाही* अशा प्रकारे सर्वांचे आधारवड असतानाही ते कधीच कुणालाही स्वतःच्या पाया देखील न पडू देणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दादा.....
अशा दादांना अध्यात्माचे बाळगडू हे आपल्या परिवाराबरोबरच त्यांचे मामा स्व.मा. खासदार शंकररावजी काळे साहेब यांच्याही घरी भेटले त्यातूनच त्यांना ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज यांचे त्यांना आशीर्वाद होते व त्यांच्याशी कनिष्ठ असे सबंध होते व सध्याही ह भ प श्री रामगिरीजी महाराज, हभप उद्धव महाराज मंडलिक,प.पू श्री रमेश गिरीजी महाराज, ह भ प श्री संजय जी महाराज आदी सर्व संत मंडळीचे त्यांना आशीर्वाद व त्यांच्याशी घनिष्ट असे सबंध असणारे संतप्रेमी म्हणजे आदरणीय दादा.......
बालपणापासून अध्यात्माची आवड असणारे व त्यातूनच सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असतानाही एक उत्कृष्ट प्रकारचे मृदंगाचार्य असणारे वारकरी म्हणजे आदरणीय दादा...
*अशा आदरणीय दादांच्या कार्याला हात लावणे म्हणजे आभाळाला हात लावण्यासारखे ठरेल* कारण त्यांचे असलेले कार्य हे लिखाणाच्या वर्णनाच्या पलीकडे असे आहे 
*आदरणीय ऍड श्री प्रमोद दादा जगताप यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक हरिमय शुभेच्छा*🥞🥞🥞

Post a Comment

0 Comments