1986 च्या बॅचचे माजी विद्यार्थीचा स्नेह मेळावा, मोठ्या उत्साहात साजरा,

टाकळीभान, ( वार्ताहर ) शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व कै. अण्णासाहेब पटारे कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे. टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व कै. अण्णासाहेब पटारे कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १० वी १९८६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना अहमद शेख होते तर व्यासपिठावर विद्यालयाचे प्राचार्य बी टी इंगळे, शिक्षक ए ए पाचपिंड, उद्योजक अश्पाक शेख, शमीम शेख, डाॅ. शारदा रणनवरे, मुक्ता गाढे, पत्रकार विजय देवळालकर, दिलीप लोखंडे, अशोक रणनवरे, बापूसाहेब नवले उपस्थित होते.
 प्रारंभी डाॅ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
   यावेळी अहमद शेख, अश्पाक शेख, डाॅ. शारदा रणनवरे, प्राचार्य बी टी इंगळे, ए ए पाचपिंड, बापूसाहेब नवले, शंकर गायकवाड, मंगल मगर दिनकर बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
         १९८६ ते २०२४ जवळपास ३८ वर्षानंतर या विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या भेटी होवून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला  या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. सकाळी ९ वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर विद्यार्थ्यांनी आपला परिचय देवून त्या वेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला.   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दिलीप खंडागळे, संतोष मगर, प्रकाश काठेड, नानासाहेब बोडखे, मेजर पोपट दाभाडे, नानासाहेब बनकर, राजेंद्र नवले आदींनी परिश्रम घेतले.
        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दिलीप खंडागळे यांनी केले तर आभार अण्णासाहेब पवार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments