श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत रोहिदास महाराज मंगळ कार्यालय, श्रीरामपूर येथे भारतीय लहुजी सेनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास अनेक भाविकांसह समाजातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता, बंधुता व मानवतेचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांच्या विचारांना समाजात रुजवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, अजीज भाई शेख, सिकंदर भाई तांबोळी तसेच बाळासाहेब त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संत रोहिदास महाराजांचे विचार आजच्या समाजासाठी मार्गदर्शक असून त्या विचारांवर आधारित सामाजिक कार्य पुढे नेण्याचा निर्धार भारतीय लहुजी सेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
0 Comments