मोटारसायकलवरून आलेल्या ०२ आरोपींचा श्रीरामपुरात बंटी जहागीरदारवर गोळीबार.




 टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरातील कॉलेजरोड परिसरातील कबरीस्तान येथून एका अंत्यविधीवरून परतत असतांना जर्मन हॉस्पिटल परिसरात एका मोटरसायकलवरून आलेल्या ०२ आरोपींनी बंटी जहागीरदार वर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.हि घटना आज 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
         या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. तसेच बंटी जागीरदार समर्थकांचा मोठा जमाव श्रीरामपूर शहरातील कामगार हॉस्पिटल समोर जमा झालेला आहे.मोटारसायकलवरुन आलेले आरोपी कोण होते ? त्यांनी नेमके कोणाच्या सांगण्यावरून गोळीबार केला? याचा पोलीस कसुन शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments